मुंबई : कोरोना संसर्ग झालेले राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता ते आठवडाभर मुंबईतच विश्रांती घेऊन त्यानंतर सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
बाळासाहेब पाटील यांना लक्षणे जाणवू लागल्यामुळे १४ ऑगस्टच्या रात्री त्यांनी अँटिजन टेस्ट करून घेतली असता टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ते कराड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल झाले. तेथे चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. खुद्द पालकमंत्रीच कोरोना बाधित निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी रूग्णालयाला भेट देऊन पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सांगली दौऱ्यादरम्यान पाटील कुटुंबीयांशी चर्चा करून पाटील यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना उपचारार्थ ब्रीच कँडीत हलवण्याचा निर्णय घेतला.
ब्रीच कँडीत चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना आज सकाळी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. त्या ठिकाणी ते आठवडाभर होम क्वारंटाईन राहणार असून त्यानंतर जनतेच्या सेवेत रूजू होणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या