सातारा : कोरोनाचे थैमान सुरू असल्याने सातारा जिल्हा हबकला आहे. कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३९६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने साडेआठ हजारांचा टप्पाही अल्पावधीत ओलांडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ८ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २६० जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे, तर ६८१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये जावली तालुक्यातील १, कराड तालुक्यातील ३३, खंडाळा तालुक्यातील २९, खटाव तालुक्यातील १६, कोरेगाव तालुक्यातील ३४, महाबळेश्वर तालुक्यातील १०, पाटण तालुक्यातील १३, फलटण तालुक्यातील २७, सातारा तालुक्यातील ८३, वाई तालुक्यातील १४ नागरिकांचा समावेश आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
पाटण तालुका : पाटण १, सोन्याचीवाडी १, दिवशी बुद्रुक २, कुंभारगाव १, मारुल हवेली ३, नवसारवाडी १, हुंबरळी १, गिरेवाडी २, शिंदेवाडी १, मल्हारपेठ १, तळमावले १, ढेबेवाडी ८.
कराड तालुका : कराड शहर पोलीस ३, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ ७, बुधवार पेठ २, गुरुवार पेठ ८, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, कराड ७, शिवाजी हौसिंग सोसायटी ४, सह्याद्री हॉस्पिटल १, मार्केट यार्ड १, काले ६, मलकापूर ९, चिखली १, पोतले १, नांदलापूर १, आगाशिवनगर १, बेलवडे १, वडगाव १, कोणेगाव १, वाठार ११, कोयना वसाहत ३, बनवडी ६, मुंढे ३, राजमाची १, गोवारे २, एचडीएफसी बँक २, गोळेश्वर ५, उंब्रज १, येळगाव १४, पाडळी केसे १, कार्वे १, शिवडे १, येणके, खुबी २.
सातारा तालुका : बुधवार पेठ २, गुरुवार पेठ ७, शनिवार पेठ १३, यादोगोपाळ पेठ २, मल्हारपेठ ५, सातारा ९, करंजे १, प्रतिभा हॉस्पिटल १, गुजरआळी २, राधिका नर्सिंग होम, शाहुपूरी ३, गडकरआळी १, सदरबझार २, गोडोली २, सुटकेस चौक, एमआयडीसी ९, नुने १, पाडळी ४, नांदगाव १, मालांज १, वर्णे १, पीरवाडी १, कृष्णानगर १, अतित २, भरतगाववाडी १८, वाढे १, धावडशी २, दौलतनगर १, नागठाणे २, पुसेवाडी २, विकासनगर २, खिंडवाडी २, लिंब १, अंबेदरे १, हेडक्वार्टर सातारा ८.
खटाव तालुका : पुसेगाव २, चोराडे १, विसापूर १, खातगुण २, डिस्कळ ४, वडूज ३, विखळे १, भोसरे २.
फलटण तालुका : महतपुरा पेठ १, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ २ , कसबा पेठ १, लक्ष्मीनगर १, मलटण ४, दत्तनगर ८, गोखळी ८, पवारवाडी १, विडणी ४, गुणवरे २, वाठार १, चौधरवाडी २, धनगरवाडा १, कृषीनगर १, मटाचीवाडी १.
माण तालुका : दहिवडी २, महाबळेश्वरवाडी ५, म्हसवड १८, देवापूर १, राणंद १, तडवळे १, वाकी वरकुटे १, भालवडी २, नरवणे १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, सोनके १, किन्हई फाटा १, सातारारोड १, पिंपोडे १, कुमठे १.
वाई तालुका : रविवार पेठ ३, मधली आळी १, सिद्धनाथवाडी, एमआयडीसी १, फुलेनगर १, सोनगिरवाडी २, बोपर्डी १, शेंदुरजणे २, पांडेवाडी १, पाचवड २, कवठे २, भुईंज १, चिखली १.
जावली तालुका : महिगाव २, सायगाव १.
खंडाळा तालुका : शिरवळ २, फुलमळा १, शिंदेवाडी १, गावडेवाडी ५, शेखमीरवाडी १, वाडवाडी १, पाडळी १, पारगाव १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ५, गवळी मोहल्ला १, राजवडी १.
याव्यतिरिक्त क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुण्गालयाच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये खावली कोरोना केअर सेंटर १८, सातारा २, केसकर कॉलनी १, खटाव तालुक्यातील वडूज, खंडाळा तालुक्यातील शिरवळ १, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी १, तळमावले १, कुंभारगाव १, वाई ८, कराड तालुक्यातील बनवडी ५, मलकापूर ७, मुंढे ३, राजमाची १, गोवारे २, एचडीएफसी बँक २, शनिवार पेठ ५, गोळेश्वर १, शिवाजी हौसिंग ४, वडोली निळेश्वर २, उंब्रज १, मंगळवार पेठ १, शनिवार पेठ १.
जिल्ह्यातील ८ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय येथे चौधरवाडी (ता. फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुष, सासपडे (ता. सातारा) येथील ६७ वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील ७४ वर्षीय पुरुष, भाकरवाडी (ता. सातारा) येथील ८२ वर्षीय पुरुष या ४ कोरोना बाधितांचा तसेच सातारा येथील विविध खासगी रूग्णालयांमध्ये गजवडी (ता. सातारा) येथील ६३ वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील ७३ वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ येथील ३५ वर्षीय पुरुष व कराड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये बनवडी (ता. कराड) येथील ४० वर्षीय पुरुष अशा एकूण ८ कोरोना बाधितांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ३८,०२६
- एकूण बाधित - ८,६७१
- घरी सोडण्यात आलेले - ४,६५८
- मृत्यू - २७७
- उपचारार्थ रुग्ण - ३,७३६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या