कोयना धरणात प्रतिसेकंद ५७ हजार ५७३ क्युसेक्स पाण्याची आवक | Latest Marathi News

धरणाचे दरवाजे ४ फुटांवरच; धरणात ९५.७९ टीएमसी पाणीसाठा 

पाटण : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे आज तिसऱ्या दिवशीही ४ फुटांवर कायम ठेवण्यात आले असून धरणातून प्रतिसेकंद २८ हजार १९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तथापि, धरणात प्रतिसेकंद तब्बल ५७ हजार ५७३ क्युसेक्स पाण्याची आवक आहे. 

कोयना धरणांतर्गत परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असणाNया कोयना धरणात आजच्या घडीला ९५.७९ टीएमसी पाणीसाठा झाला असून उपयुक्त पाणीसाठा ९०.६७ इतका आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप ९.४६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पावसाचे वाढते प्रमाण आणि पाण्याची वाढती आवक लक्षात घेता ९५ टीएमसीपर्यंत पाणीसाठा स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पावसाची संततधार सुरूच असल्याने रविवारीही कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे ४ फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० व सहा वक्र दरवाजातून २५ हजार ९१९ असा एकूण प्रतिसेकंद २८ हजार १९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
 
धरणात प्रतिसेकंद ५७ हजार ५७३ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे २५ (३९६१), नवजा येथे ४८ (४५६१) आणि महाबळेश्वर येथे ११ (४४०२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम घाटातील अतिपर्जन्यवृष्टी क्षेत्रातील प्रतापगड येथे १७ (३८६०), सोनाट २० (३२७५), काठी २१ (२८२१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या