जिल्हा भाजपवर डॉ. सुरभी चव्हाण, सतीश भोसले यांची वर्णी | Latest Marathi News

सातारा : भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरभी चव्हाण - भोसले यांची, तर भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश भोसले यांची निवड करण्यात आली.

पक्षाच्या कार्यकारिणीत तरूण तसेच अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून डॉ. सुरभी चव्हाण - भोसले या शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या मदनदादा भोसले यांच्या कन्या आहेत. तसेच सतीश भोसले हे राज्य मजूर फेडरेशनचे संचालक असून मदनदादा भोसले यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी गेली २५ वर्षे पक्षपातळीवर केलेल्या संघटनात्मक कामाच्या जोरावर विक्रम पावसकर यांनी त्यांची निवड केली आहे. संघटनात्मक तसेच प्रशासकीय व सहकार क्षेत्रातील कामांचा अनुभव पाहता त्यांची निवड झाली आहे. 

या निवडीबद्दल ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, वाई तालुकाध्यक्ष रोहीदास पिसाळ, खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, किसनवीर कारखान्याचे सर्व संचालक, भुईंजचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, भुईंज सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या