‘बिगिन अगेन’ केव्हा ? सातारा जिल्हा टुरिझम असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव | Latest Marathi News


सातारा :
शासनाच्या 'मिशन बिगिन अगेन'नुसार सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची निवासी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याची मागणी सातारा जिल्हा टुरिझम असोसिएशनतर्फे चंद्रसेन जाधव व विनोद कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने दि. ६ जुलै रोजी जाहीर केलेल्या मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यास काही अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आलेली आहे. बाजूच्या जिल्ह्यांमध्ये या आदेशाद्वारे निवासी हॉटेल्स सुरू करण्यात आलेली आहेत. पण सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस गेले साडेपाच महिने बंद अवस्थेतच आहेत. जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असल्याकारणाने हॉटेल्स, रिसॉर्टस्, निवास व न्याहरी योजनेतील कृषी पर्यटन केंद्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. या व्यावसायिकांचा आणि या व्यवसायावर अवलंबून असणाNया हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा टुरिझम असोसिएशन ही संस्था पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नांबरोबरच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी व्यवसायात येणाNया अडीअडचणींसंदर्भात या संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या