राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना पॉझिटिव्ह | Latest Marathi News

सातारा : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाच दिवसांपूर्वी कराडला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री त्यांच्या संपर्कात आले होते.

बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटिजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल शुक्रवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आला. त्यांनंतर त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वृत्तामुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या काही निकटवर्तीयांनी दक्षता घेत होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वीही राज्य मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता बाळासाहेब पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याने आज सातारा जिल्ह्याच्या मुख्य ध्वजारोहन सोहळ्यात त्यांच्याऐवजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ध्वजारोहन केले.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या