रूग्णवाढीच्या वेगाने सातारा जिल्हा हादरला; आणखी ९ जणांचा मृत्यू | Latest Marathi News

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरश: कहर पहायला मिळत असून रविवारच्या रात्री तर कोरोना रूग्णवाढीचा आजवरचा उच्चांक गाठला गेल्याने जिल्हा हादरला आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील तब्बल ४४३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या उच्चांकी वाढीसह जिल्ह्याने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

या भयावह रूग्णवाढीसह जिल्ह्यात मृत्युचे थैमानही चिंताजनक असून आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील ९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सातारा व कराड तालुक्यांमधील प्रत्येकी ३, कोरेगाव, पाटण व वाई तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ६५ ते ८० वयोगटातील सहा लोक दगावले असून धक्कादायक बाब म्हणजे ३० वर्षीय महिला व ३६ वर्षीय पुरूष हेही मृत्यूमुखी पडले आहेत.

कोराना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १०, शनिवार पेठ ३, रविवार पेठ ६, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ २, शुक्रवारपेठ १, केसरकर पेठ २, मल्हारपेठ १, विसावा नाका १, सदरबझार ३, केसरकर कॉलनी १, गोडोली १, शाहूपुरी ३, विलासपूर ४, कोडोली २, आंबेदरे ३, नागठाणे १, राजेवाडी, निगडी ८१, क्षेत्रमाहुली २, सासपडे ७, भाटमरळी १, बजाज कॉलनी माहुली १, खेड १, आबाचीवाडी १, यादोगोपाळ पेठ १, कारंडवाडी ३, करंजेपेठ ४, पळशी ७, बोरगांव १, कोंडवे ३, अतित ५, सम्राटनगर १, करंजे २, शिवथर १, धोंडेवाडी १, नागठाणे ४, खोडद ९, अपशिंगे ४, संगमनगर १, कुमठे १, एमआयडीसी १, सिटीपोलीस लाईन १. 

खटाव तालुका : वडूज १, खटाव  ४, पुसेगाव १, नेर ४, मायणी २, पुसेसावळी ४, वडी १, राजाचे कुर्ले १, एनकुळ १, नांदोशी २, बुध २, विसापूर ३, औंध ३, भोसरे २, डिस्कळ १, वेटणे १, येळीव १.

कराड तालुका : कराड १३, शनिवार पेठ ६, रविवार पेठ १, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ १, उपजिल्हा रुग्णालय १, हरपळवाडी १, ओंड २, हजारमाची ३, आगाशिवनगर ५, मसूर १, सावर्डे २, वाठार २, जुळेवाडी १, खोडशी १, मलकापूर ३, कोयना वसाहत १, वडगाव हवेली १, काले १,  वाघेरी १, बेलमाची १, गोटेवाडी १, उंडाळे १, बनवडी ५, पाल १, किवळ २, बेलवडे बुद्रुक ३, कोपर्डे हवेली १, गोवारे १, हजारमाची १, रेठरे बुद्रुक १.

कोरेगाव तालुका : सातारारोड ४, भक्तवडी १, चिमणगाव ४, रेवडी १, किन्हई १, बोलेवाडी १, पिंपोडे बुद्रुक ८, आंबवडे १, महादेवनगर १.

फलटण तालुका : फलटण १, मंगळवार पेठ १, कोळकी १, अलगुडेवाडी १, धुळदेव १, तरडगाव १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ५.

माण तालुका : पळसावडे १, म्हसवड १९, स्वरुपखानवाडी ३.

पाटण तालुका : पाटण १, ढेबेवाडी २, धामणी १ शिबेवाडी १, सुपुगडेवाडी १, रामिष्टेवाडी १, भोसगाव २, खांडववाडी २.

खंडाळा तालुका : शिरवळ ३, केसुर्डी १, लोणंद ७, संभाजी चौक १, सुखेड १, हरळी १, अजनुज १, भादे ३, जवळे १, शिंदेवाडी १, शिवाजीनगर २.

वाई तालुका : वाई १, यशवंतनगर १, सोनगीरवाडी १, भुईंज ३, सुरुर १, उडतारे ७,  अमृतवाडी १, वेलंग ४, पाचवड ४, आसले ३, शेलारवाडी ४, वहागाव ३, बावधन ६, कवठे २, पाचवड १, दह्याट १, बावधन नाका १, जांभ १.

जिल्ह्यात ९ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे  ओंड (ता. कराड) येथील ५१ वर्षीय पुरुष, सोळशी (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ (सातारा) येथील ६८ वर्षीय महिला, चोरे (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये तामजाईनगर (सातारा) येथील ३६ वर्षीय पुरुष, बनवडी (ता. कराड) येथील ७९ वर्षीय पुरुष, विक्रमनगर, पाटण येथील ६५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ (वाई) येथील ७१ वर्षीय पुरुष, तासगाव (ता. सातारा) येथील ३० वर्षीय महिला अशा एकूण ९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या