विनावापर वाहून जाणारे पाणी दुष्काळी सिंचन योजनांना
सातारा : कोयना धरणातून नदीपात्रात विनावापर सोडण्यात येणारे पाणी दुष्काळी सिंचन योजनेला देण्याच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे जनतेचे नुकसान होण्यापेक्षा दुष्काळी तालुक्यातील जनतेला न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे कोयना धरण दुष्काळी तालुक्यातील जनतेसाठी भाग्यलक्ष्मी ठरेल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मंगळवारी कोयना धरणाला भेट देवून पूरपरिस्थिती हाताळण्याबाबत कोयना धरण व्यवस्थापन सतर्वâ आहे का याची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंत शेलार, पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, अतिरिक्त पोलीस अधिकारी धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
संभाव्य पूरपरिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील धरणांच्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. मंगळवारपासून टेंभू, म्हैसाळ योजना सुरू करण्यात आल्या असून तलाव भरण्यात आले आहेत. पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला द्यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यावर्षी पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळी भागाला पुराचे वाहून जाणारे पाणी देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
डाव्या तीरावरील वीजगृहाला लवकरच मान्यता !
कोयना धरण पाहणीप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाच्या डाव्या तीरावर उभारण्यात येत असलेल्या पायथा वीज गृहाच्या कामाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देवून हे काम तातडीने सुरू करण्यासाठी मान्यता देणार असल्याचे सांगितले. कोयना प्रकल्पग्रस्त युवकांच्या महानिर्मिती कंपनीतील नोकरभरतीविषयी मंत्रालयात बैठक घेवून याबाबत तोडगा काढणार काढू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या