ना मिरवणुका, ना ढोलताशे; तरीही श्रींचे भक्तिभावाने स्वागत | Latest Marathi News

सातारा : कोरोनाच्या जीवघेण्या संकटामुळे हवालदिल असुनही सातारा जिल्हावासीयांनी विघ्नहत्र्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. 'मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात घरोघरी गणरायाचे आगमन झाले. विधिवत पूजाअर्चा करून गणेशभक्तांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि 'हे कोरोनाचे महाविघ्न दूर कर' असे साकडे गणरायाला घातले. दरम्यान, मिरवणुकांचा जल्लोष, ढोलताशांचा कडकडाट यांचा अभाव यावेळच्या गणेशोत्सवात प्रकर्षाने दिसून आला.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर कधी नव्हे इतक्या मर्यादा आल्या आहेत. कित्येक मंडळांनी यावेळी पारंपरिक उत्सवाला फाटा देऊन त्याऐवजी अन्य उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे. मंडळाच्या मूर्ती चार पुâटापेक्षा जास्त उंचीच्या नाहीत. त्यामुळे यावेळी सार्वजनिक उत्सवाची औपचारिकता दिसत आहे. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात कुठेही मिरवणुका दिसल्या नाहीत, ढोलताशे वाजले नाहीत. गणरायाच्या आगमनाचा जल्लोषी थाट यावेळी दिसला नाही याचे शल्य सर्वच गणेशभक्तांमध्ये दिसून आले.

मात्र, घरगुती गणेशोत्सवाची परंपरा लोकांनी संकटातही कायम ठेवल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात पारंपरिक पोषाखात गणेशमूर्ती घरी नेऊन भक्तिभावाने व उत्साहाने प्रतिष्ठापना करण्यात आली. 'मंगलमूर्ती मोरया'च्या गजरात लोकांनी विघ्नहत्र्याचे स्वागत करून 'कोरोनाच्या संकटाचे निवारण कर' असे साकडे त्याला घातले. गणरायाच्या आगमनासोबत दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरूवात झाली. घरोघरी गणरायासाठी आकर्षक सजावटी करण्यात आल्या असून काही ठिकाणी सजावटीमध्ये कोरोनाच्या महामारीचे प्रतिबिंबही पहायला मिळत आहे.

जलमंदिरमध्ये उत्साहात स्वागत

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी साताऱ्यात जलमंदिर पॅलेसमधील गणेशोत्सवाची उत्साहात सुरूवात झाली. सकाळी जलमंदिरमध्ये गणरायाचे आगमन झाल्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या