सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ३२२ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. तर ६८२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरोनावर मात करून घरी परतलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील १८, कराड तालुक्यातील ४२, खंडाळा तालुक्यातील ३, खटाव तालुक्यातील १२, कोरेगाव तालुक्यातील ११, महाबळेश्वर तालुक्यातील ६, माण तालुक्यातील १०, पाटण तालुक्यातील २८, सातारा तालुक्यातील १६४, वाई तालुक्यातील २८ नागरिकांचा समावेश आहे.
दरम्यान, आज दिवसभरात सातारा येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील १८, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड ७१, फलटण ३९, कोरेगाव ३४, वाई ४४, खंडाळा ७५, रायगांव ३२, पानमळेवाडी ८५, मायणी ६१, महाबळेश्वर ६०, दहिवडी ८, खावली २५ व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील १३० असे एकूण ६८२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ४४,१२३
- एकूण बाधित - १२,८८८
- घरी सोडण्यात आलेले - ७,१०९
- मृत्यू - ३७१
- उपचारार्थ रुग्ण - ५,४०८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या