साताऱ्याजवळील बोरणे घाटात दरड कोसळली | Latest Marathi News

सातारा : सातारा ते ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळण्याची घटना घडली. दरडीसह छोटे दगड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारी सकाळी पवनचक्की वंâपनीच्या कर्मचाNयांनी ही दरड हटवल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरड हटवण्याचे काम सुरू केले. गेले काही दिवस सातारा जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा - ठोसेघर मार्गावर सज्जनगड फाट्याच्या पुढे असणाNया बोरणे घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. मोठ्या दरडीसह छोटे - छोटे दगड रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चाळकेवाडी (ता. सातारा) पठारावर असणाऱ्या पवनचक्की कंपनीमध्ये साताऱ्यातील काहीजण नोकरीला आहेत. ते साताऱ्यातून कंपनीच्या बसने चाळकेवाडीकडे जात असताना दरड कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर साधारण आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी छोटे-छोटे दगड हटवून एकेरी वाहतूक सुरू केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दरड हटवण्याचे काम सुरू केले.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या