मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा कोरोनामुळे जिल्हा मुख्यालय केंद्रावर घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आयोगाच्या अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दि. १४ ऑगस्टच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिपत्रकानुसार दि. २० सप्टेंबर रोजी नियोजित परीक्षेसाठी केवळ पुणे जिल्हा निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांच्या मूळ पत्त्याच्या महसूल विभागीय ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हीड-१९ मुळे सर्व जिल्हाधिकारी यांनी आंतरजिल्हा बंदी घातली आहे. प्रवासास अत्यंत महत्त्वाचे कारण असेल तरच परवानगी मिळते. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ही विभागीय आयुक्त मुख्यालय शहरे ही हॉट स्पॉट आहेत. या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकाला विलगीकरण केले जाते. तसेच या शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला येणार आहेत. त्यामुळे या शहरातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताणही येणार आहे. बहुतांश विद्यार्थी हे गरीब घराण्यातील असतात. मोठ्या शहरांमध्ये राहण्याची त्यांची व्यक्तिगत सोयही नसते व त्यामुळे बाहेर राहण्याचा खर्च परवडत नाही. यामुळे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा या जिल्हा पातळीवरील केंद्रात घेण्यात याव्यात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची केंद्रे ही जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ठेवणे योग्य होणार आहे. विद्यार्थ्यांचा मूळ पत्ता असेल त्याच जिल्ह्यात केंद्र उपलब्ध करून घ्यावे. दि. १४ ऑगस्टच्या परिपत्रकामध्ये केवळ पुणे जिल्ह्यात परीक्षा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांचे केंद्र बदलून मिळणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई सेंटर निवडले आहे त्यांना या परिपत्रकाचा लाभ होणार नाही. त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांना दि. २० सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जिल्हा मुख्यालय केंद्रावर घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती आमदार डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या