कराड, मलकापूरसाठी ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या रुग्णवाहिका | Latest Marathi News


कराड :
कराड शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक विकास निधीतून कराड व मलकापूर नगरपरिषदेसाठी ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या दोन अद्ययावत रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. शहरात ऑक्सिजन मशिनचीही कमतरता आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने काहींचे मृत्यूही झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर आणि फारुख पटवेकर यांनी नगरपालिकेस ऑक्सिजनची सुविधा असणारी रूग्णवाहिका देण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विनंती केली होती. त्यानंतर याबाबत पाठपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन दिले होते. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने कराड नगरपालिकेस एक व मलकापूर नगरपालिकेस एक अशा दोन रूग्णवाहिका देण्यात येणार आहेत. कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर या रुग्णवाहिका तातडीने दोन्ही नगरपालिकांकडे दाखल होणार आहेत.

कराड नगरपालिकेने गेल्या महिन्यात १ रुग्णवाहिका व १ शववाहिका खरेदी केली आहे. तरीही या वाहनांवरील ताण वाढत असल्याने आणखी एक ऑक्सिजनची सोय असणारी रूग्णवाहिका चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात येणार आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या