तासनतास फोन करूनही १०८ ची सेवा मिळेना; उलट मिळतात दुरूत्तरे | Latest Marathi News


मसूर :
आधीच कोरोनाच्या महामारीने हैराण असलेल्या कोरोना योध्यांना व कोरोनाग्रस्तांना ‘१०८’ च्या नाना तऱ्हांनी वैताग आणला आहे. तासनतास फोन करूनही १०८ सेवेची गाडी उपलब्ध तर होतच नाही. उलट वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांना १०८ च्या कर्मचाऱ्यांच्या उद्धट उत्तरांचा प्रसाद मिळत आहे. याबाबत योग्य ती कारवाई व्हावी व कोरोना योध्यांची, कोरोना रुग्णांची गैरसोय दूर व्हावी अशी मागणी होत आहे.

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आघाडी शासनाच्या काळात १०८ ची सुविधा उपलब्ध केली होती. आजपर्यंत वेळेत १०८ ची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांचे प्राण वाचल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना अनेकदा १०८ ची गरज रुग्णांबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडत आहे. मात्र १०८ च्या नाना तNहांचा अनुभव मसूर परिसरातील हेळगाव, कालगाव, खराडे, कोणेगाव येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक व रुग्णांच्या नातेवाईकांना नुकताच आला. कोरोनाच्या महामारीत खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना १०८ या सेवेचा मोठा आधार होता. मात्र आठ ते दहा तासात अनेकदा फोन करूनही १०८ ची सुविधा उपलब्ध होत नाही. त्याबरोबरच १०८ च्या कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाचा कळस झाला आहे. त्यांच्या उद्धट बोलण्याने सर्वसामान्य जनता व प्रशासकीय अधिकारी हैराण झाले आहेत. तसेच अनेकदा १०८ ला वारंवार फोन करूनही फोन उचलला जात नसल्याच्या घटना घडत असल्याचे अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व कोरोनाग्रस्त पेशंट व नातेवाईकांनी सांगितले. उद्धट वर्तनाचा व गलथान कारभाराचा फटका कोरोनाग्रस्तांना बसून त्यातून एखादा रुग्ण दगावल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवालही सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

अखेर खाजगी गाडीने रुग्णालयात हलवण्याची वेळ

हेळगाव (ता. कराड) येथील कोरोनाग्रस्त रूग्णाला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी १०८ नंबरवर गुरुवारी दुपारी चार वाजल्यापासून संपर्वâ साधला जात होता. मात्र रात्री दहा वाजले तरी १०८ ची सुविधा उपलब्ध न झाल्याने शेवटी खाजगी गाडीतून त्या रुग्णाला सातारला हलवावे लागले.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या