सातारा : कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताई जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यांच्या लढाईला बळ देण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले - चव्हाण यांच्या माध्यमातून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आशाताईना गुडुची टॅबलेट, सॅनिटायझर व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.
फडणवीस व पाटील यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावेळी हा कार्यक्रम झाला. यावेळी सुवर्णा दगडे, वैशाली भोसले, अर्चना झोरे, रजनी ओतारी व अनिता एरंडे या आशाताईंना या कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, संचालक मधुकर शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सतिश भोसले, सरचिटणीस सचिन घाटगे, वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, वाई शहराध्यक्ष राकेश फुले, भुईंजच्या सरपंच पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, यश भोसले, इशान भोसले, शेखर भोसले - पाटील, उद्योजक रणजीत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
गुडुची टॅबलेटचे औषधी गुणधर्म
गुडुची टॅबलेटमुळे जीवनावश्यक पोषक तत्त्व वाढण्यास मदत होते. ही टॅबलेट विषाणू अथवा जीवाणूजन्य ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, वास किंवा चव जाणे, कफ आदी लक्षणांवर प्रभावी काम करते. या टॅबलेटच्या संवनाने पचनसंस्था बळकट होऊन यकृताची कार्यक्षमता वाढते. तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या