सातारा : कोरोनाच्या संकटकाळात आरटीओ कार्यालयाशी संबंधित विविध कामे मोठ्या प्रमाणात खोळंबून पडल्याने आणखी चिंताग्रस्त झालेल्या वाहनधारकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १ पेâब्रुवारी रोजी मुदत संपली असेल विंâवा ३१ डिसेंबर २०२० रोजी कालबाह्य होईल अशी सर्व कागदपत्रे दि. ३१ डिसेंबरपर्यंत वैध मानली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे मोटर वाहन अधिनियम १९८८ आणि वेंâद्रीय मोटर वाहन अधिनियम १९८९ शी संबंधित विविध कागदपत्रांच्या वैधतेच्या नूतनीकरणामध्ये लोकांना अडचणी येत आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या अनुषंगाने रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहनसंबंधी कागदपत्रांची वैधता वाढवण्याबाबत सर्व राज्य आणि वेंâद्रशासित प्रदेशांना दि. ३० मार्च आणि त्यानंतर ९ जून रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, वाहन चालवण्याचा परवाना, नोंदणी विंâवा इतर कोणतेही संबंधित कागदपत्रे ज्यांची मुदत वाढवता येऊ शकते विंâवा लॉकडाऊनमुळे वाढवता येऊ शकली नाही आणि ज्यांची मुदत दि. १ पेâब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान संपेल अशी कागदपत्रे दि. ३० सप्टेंबरपर्यंत वैध मानली जावू शकतात असा आदेश जारी करण्यात आला होता.
देशभरात कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता उपरोक्त सर्व कागदपत्रांचे लॉकडाऊनमुळे नूतनीकरण करता आले नाही आणि दि. १ पेâब्रुवारी रोजी ज्यांची मुदत संपली असेल विंâवा ३१ डिसेंबर २०२० रोजी कालबाह्य होईल अशी सर्व कागदपत्रे दि. ३१ डिसेंबरपर्यंत वैध मानली जातील. यामुळे सर्व नागरिकांना वाहतुकीशी संबंधित सेवेचा लाभ घेता येणार आहे. तथापि, यामध्ये विमा प्रमाणपत्रांचा समावेश नाही. कोरोना काळात नागरिक, वाहतुकदार आणि अनेक संस्थांना त्रास होऊ नये तसेच कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सातारचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या