सातारा जिल्ह्यात ४८९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह; तर १५ नागरिकांचा मृत्यू | Latest Marathi News


सातारा :
मागील दोन दिवसात रूग्णवाढीचा सहाशेच्या वर पकडलेला सूर आज काहीसा धीमा झाल्यामुळे जिल्हावासीयांचा जीव तूर्त भांड्यात पडला. शनिवारी रात्री जिल्ह्यात नवीन ४८९ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चौदा हजारच्या उंबरठ्यावर जावून धडकला आहे. तसेच रात्रीपासून जिल्ह्यात १५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्यादेखील चारशेच्या घरात गेली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये...

कराड तालुका : सोमवार पेठ २, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ ३, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ११, रविवार पेठ १, वाकान रोड १, कराड हॉस्पिटल ३, कार्वे नाका ८, उपजिल्हा रुग्णालय १, विद्यानगर २, कोयना वसाहत १, मसूर २, पाल १, कोपर्डे हवेली ३, मलकापूर ५, घारेवाडी २, येवती १, बनवडी १, आगाशिवनगर १, रेठरे बुद्रुक ३, वडोली निळेश्वर १, शेरे २, वारुंजी १, येणपे १, गोळेश्वर १, गोटे २, पार्ले १, काले २, करवडी ६, रुक्मिणीनगर १, मल्हारपेठ १, विरवडे १, पाडळी केसे १.

सातारा तालुका : सातारा ७, सोमवार पेठ ७, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ ३, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ८, रविवार पेठ ५, भवानी पेठ १, दुर्गापेठ १, गडकर आळी १, गोळीबार मैदान १, सिटी पोलीस लाईन १, सिव्हिल क्वार्टर १, एस. पी. ऑफिस २, सासपडे १, यादोगोपाळ पेठ १, शाहूपुरी ४, चाळकेवाडी १, सैदापूर ३, करंजे ३, शाहूनगर ३, अतित १, पोलीस ऑफिसर्स क्वार्टर १, खेड ४, बोरखळ १, कोडोली ३, सहकार नगर १, सदर बझार २, डबेवाडी ७, लिंब ३, गोवे २, वडुथ ४, तामजाईनगर २, वळसे १,  सोनगाव तर्फ १, अपशिंगे ६, नागठाणे ७, वर्ये १, सिव्हिल कॉलनी, संभाजी नगर ३, गोडोली ३, बोरगांव १, श्री नगर, एमआयडीसी ४, नांदगाव १, सूर्यवंशी कॉलनी १, दिव्यनगरी १, हरेकृष्ण पॅराडाईज १, एमआयडीसी २, संगमनगर २, वनवासवाडी २, भरतगांव १, महागाव २, अंगापूर १, गेंडामाळ २, परळी १, हमदाबाद ४.

पाटण तालुका : पाटण २, दिवशी बुद्रुक १, मोरगिरी प्रा. आ. केंद्र १०.

वाई तालुका : वाई ३, यशवंतनगर १, धर्मपुरी पेठ १, गणपती आळी २, रविवार पेठ ४, रामडोह आळी ४, ब्राह्मणशाही १, सह्याद्रीनगर १, सोनगीरवाडी ३, उडतरे ५, बावधन १, भोगाव २, गितांजली हॉस्पिटल १, जांब १, शेंदुरजणे १, शहाबाग १, काळंगवाडी ९, मुंगसेवाडी १, ज्ञानदेव नगर १, यशवंतनगर १, सदाशिव नगर १, भुईंज १, विरमाडे १, पाचवड २.

कोरेगाव तालुका : सोनके १, कोरेगांव १०, एकंबे २, गोळेवाडी १, मंगळापूर २, कुमठे ६, जळगाव २, भाकरवाडी २, कठापूर २, रहिमतपूर १.

महाबळेश्वर तालुका : पाचगणी १, भिलार २, गवळी मोहल्ला ५, नगरपालिका ६, दरे कुंभरोशी १,रांजनवाडी १, एमआयडीसी ५, पोलीस स्टेशन १.

जावली तालुका : मेढा १, जावली १, आंबेघर १४, हुमगाव २, गवडी ७, बामणोली १, भोगवली १, आनेवाडी २.

खंडाळा तालुका : शिरवळ ७, निंबोडी ४, पिसाळवाडी १, पळशी १, हरळी १, खंडाळा ५, शिरवळ १, मोर्वे १, बावडा ५, केसुर्डी २, खेड ४.

फलटण तालुका : फलटण ५, शुक्रवार पेठ १, मलठण ५, जाधववाडी १, विडणी ३, बिबी १, तरडगांव ७, बरड ३, शिंदेनगर २, पिंपरद २, सातेफाटा २, धुळदेव २, राजाळे १, तांबवे १.

खटाव तालुका : वडूज २, पुसेगाव ११, मायणी ८, कातरखटाव १०, चोराडे २, राजापुरी १, सिध्देश्वर कुरोली ४, विसापूर ६, निढळ १,  खातगुण १.

माण तालुका : म्हसवड १, दहिवडी ४, निमसोड १, पांगारी १, माळवाडी १.

जिल्ह्यात १५ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे कडगांव (ता. पाटण) येथील ७९ वर्षीय महिला, दुर्गापेठ (सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, राजापुरी (ता. खटाव) येथील ३० वर्षीय महिला, गुरुवार पेठ (सातारा) येथील ६७ वर्षीय पुरुष, कवडेवाउी (कोरेगांव) येथील ७५ वर्षीय पुरुष, जावळे (ता. फलटण) येथील ५८ वर्षीय महिला. तसेच कराड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये पाटण येथील ७६ वर्षीय महिला, गोळेश्वर (ता. कराड) येथील ५५ वर्षीय पुरुष, पापर्डे (ता. पाटण) येथील ५२ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ (कराड) येथील ५७ वर्षीय महिला, तर सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये शिरवळ (ता. खंडाळा) येथील ६४ वर्षीय पुरुष, डीसीएच म्हसवड येथे पुसेगाव (ता. खटाव) येथील ७९ वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील ५८ वर्षीय पुरुष, पुसेसावळी (ता. खटाव) येथील ६० वर्षीय पुरुष, भाटी (ता. माण) येथील ५५ वर्षीय महिला अशा एकूण १५ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  1. घेतलेले एकूण नमुने - ४४,३७८
  2. एकूण बाधित - १३,९९७
  3. घरी सोडण्यात आलेले - ७,२०८
  4. मृत्यू - ३९७
  5. उपचारार्थ रुग्ण - ६,३९२

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या