सातारा : लॉकडाऊनचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला असून राज्यात काय सुरू होणार आणि काय बंद राहणार यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या सूचनांमध्ये शासनाच्या 'मिशन बिगिन अगेन'ची छाप दिसून येत आहे. यानुसार २ सप्टेंबरपासून जिल्ह्यांच्या सीमा विनापास खुल्या करण्यात आल्या आहेत. खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीस तसेच हॉटेल, लॉजिंगला आदर्श कार्यप्रणालीनुसार परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात या बाबींना मनाई...
सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील. तथापि, ऑनलाईन / अंतराचे शिक्षणास परवानगी.
चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट काँप्लेक्समधील), बार, सभागृह, असेंबली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.
रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा आदर्श कार्यप्रणालीनुसार सुरू राहील.
सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई.
सर्व र्धािमक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापि, तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
वय वर्ष ६५ वरील व्यक्ती, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला, १० वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध.
सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील या बाबींना परवानगी (दि. २ सप्टेंबरपासून)
सर्व हॉटेल व लॉजिंग सुरू ठेवण्यास परवानगी. तथापि, शासनाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक.
व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाNया व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परवान्याची आवश्यकता नाही.
खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी. तथापि, त्याकरिता परिवहन आयुक्त यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक.
बाहय शारीरिक क्रियाकलाप करण्यास कोणतेही बंधन असणार नाही.
सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतुकीतील लोकांच्या हालचाली करण्यास याप्रमाणे परवानगी - टॅक्सी / कॅब/ अॅग्रीगेटर (फक्त अत्यावश्यक) - १ अधिक ३, रिक्षा (फक्त अत्यावश्यक) - १ अधिक २, चारचाकी (फक्त अत्यावश्यक) १ अधिक ३, दोन चाकी - १ अधिक १ मास्क व हेल्मेटसह. प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक.
सर्व मार्केट / दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये सुरू राहतील. तथापि, औषध दुकाने पूर्णवेळ सुरू. जर पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करावीत.
सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह, घर व घराच्या परिसरात २० लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे / समारंभाचे आयोजन करण्याकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक.
अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास २० पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी.
वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी.(घरपोच वितरणासह)
केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्याकडील आदेश दि. २७ जून मधील अटी व शर्तीन्वये सुरू ठेवण्यास परवानगी.
सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश दि. ११ जून मधील अटी व शर्तीन्वये सुरू ठेवण्यास परवानगी.
जिल्ह्यातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या