अपघातात ठार झालेले साळिंदर खाण्यासाठी घरी घेऊन जाणे पडले भलतेच महागात | Latest Marathi News


कराड :
प्रामुख्याने जंगली भागात आढळणारा व आपल्या अंगावरील अणकुचीदार काट्यांच्या सहाय्याने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणाऱ्या साळिंदर प्राण्याला खाण्याच्या उद्देशाने घरी घेऊन जाणे एका व्यक्तीस चांगलेच महागात पडले. ऐनवेळी वनविभागाला याची टीप मिळाल्यामुळे आज भल्या पहाटे त्याच्या घरी वनविभागाने छापा टाकून मृत साळिंदर ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधितासही ताब्यात घेण्यात आले असून त्याची स्विफ्ट डिझायर गाडीही (एमएच १४ सीएक्स ६६७१) जप्त करण्यात आली आहे. 

शशिकांत जोतिराम पवार असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा चरेगावचा असून कराडमध्ये राहतो. हेळगाव ही त्याची सासरवाडी असून तेथेच त्याचा व्यवसायही आहे. काल रात्री कराड तालुक्यातील मसूर - हेळगाव रस्त्यावर कचरेवाडीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने साळिंदराचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी मृत अवस्थेत पडलेल्या या साळिंदराला शशिकांत पवार हा खाण्याच्या उद्देशाने घरी घेऊन गेला. दरम्यान, या व्यक्तीच्या घरात बाथरूममध्ये ते साळिंदर पोत्यात भरून ठेवले असल्याची माहिती ‘हॅलो फॉरेस्ट १९२६’ वरून वनविभागाला मिळाली. त्यानुसार कराड येथील कार्वे नाक्यावरील शिवांजली अपार्टमेंटमधील पवार याच्या फ्लॅट नं. ३ मध्ये वनविभागाने धाड टाकली. त्यावेळी मृत साळिंदर मिळून आले. कचरेवाडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत झालेले हे साळिंदर आपण आपल्या गाडीतून रात्री साडेनऊ वाजता घरी घेऊन आल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार कलम ९, ३९, ४४, ४८ अ, ५१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली आहे.

वनक्षेत्रपाल विलास काळे (कराड), वनपाल ए. पी. सव्वाखंडे (मलकापूर), वनरक्षक रमेश जाधवर (मलकापूर), वनरक्षक प्रशांत मोहिते (किवळ), वनरक्षक भारत खटावकर (विजयनगर), वनरक्षक सुनिता जाधव (शेणोली), कराड शहर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल, होमगार्ड व पंच रोहन भाटे, भाऊसाहेब नलवडे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, या साळिंदराचे शवविच्छेदन करून त्यानंतर त्याचे दहन करण्यात आल्याचे वनविभागाच्या अधिकाNयांनी सांगितले.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या