विनाकारण कोणीही बेड अडवून ठेवू नका - शिवेंद्रसिंहराजे
सातारा : रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, परंतु कोणतेही लक्षण दिसत नाही असे अनेक रूग्ण आहेत. परंतु असे असताना फक्त भीतीपोटी काही रुग्णांकडून बेडवर कब्जा करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे विनाकारण कोणीही बेड अडवू नका, असे कळकळीचे आवाहन सातारा - जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच हॉस्पिटल्समध्ये बेड शिल्लक नाहीत. हॉस्पिटलमधील बेडची खरी गरज चिंताजनक प्रकृती असलेल्या तसेच वृध्द रुग्णांना आहे. पण भीतीपोटी काहीजण बेड अडवून ठेवत आहेत. कोणतेही लक्षण नाही किंवा फारसा त्रास होत नाही अशा रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय दिला आहे. अशा रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये उपचार घ्यावेत, जेणेकरुन गरजू रुग्णांना बेड मिळेल आणि त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचतील, असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका, सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहनही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या