आनेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपी गजाआड | Latest Marathi News


 सातारा : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर काही महिन्यांपूर्वी अंदाधुंद गोळीबार झाला होता. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा घडल्यानंतर २ वर्ष कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. अखेर या प्रकरणातील मोक्कातील पसार संशयित आरोपीला पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वेल्हे तालुक्यातील वांगणी येथून अटक केली आहे. सोपान दिनकर चोरगे (रा. वांगणी, ता. वेल्हे, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

चोरगे याने दि. २५ मार्च २०१९ रोजी आनेवाडी टोल नाक्यावर टोल भरण्याच्या वादातून गोळीबार करून फिर्यादी पांडुरंग घनश्याम पवार (रा. चिंधवली, ता. वाई) यांना जखमी केले होते. तपासाअंती या प्रकरणात मोक्का लागलेल्या संशयिताचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. सोपान चोरगे हा वांगणी येथील कल्याण खिंड परिसरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने ट्रॅप लावला. या ट्रॅपमध्ये चोरगे हा सापडला. त्याच्याकडे या गोळीबार प्रकरणी चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांसमवेत गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्हा झाल्यापासून चोरगे हा पसार होता. एलसीबीने अटक केल्यानंतर चोरगेला वैद्यकीय तपासणीसाठी भुईंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या