कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामना कसा रंगणार याकडे देशाचे लक्ष
Marathi News... नवी दिल्ली : देशभर कोरोनाचे थैमान सुरू असताना बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले असून निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी २८ ऑक्टोबर, ३ व ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार असून १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीत सत्तारूढ संयुक्त जनता दल - भाजप युती व राजद - काँग्रेस - समविचारी पक्ष यांची आघाडी यांच्यात हा मतसंग्राम होणार असला तरी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा सामना कसा रंगणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
सद्यस्थितीत बिहार निवडणुकीचे भवितव्य काय याविषयी संभ्रम होता. याबाबतीत काय निर्णय घेतला जातो याकडे बिहारसह देशातील जनतेचे लक्ष लागले होते. या सर्व तर्कवितर्कांना आज पूर्णविराम देत निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा घोषणा केली. यानुसार तीन टप्प्यात मतदान होणार असून १० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन बिहारच्या जनतेचा कौल कोणाला याचा फेसला होणार आहे. ११ नोव्हेंबरला रमा एकादशीपासून दीपावलीची धामधूम सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येलाच बिहारचे फटाके फुटणार आहेत.
पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला ७१ मतदारसंघात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ मतदारसंघात, तर तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत संयुक्त जनता दल व लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल यांनी एकत्र येऊन भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले होते. या आघाडीला जबरदस्त यश मिळाले होते व नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती. परंतु नंतर भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी संधान बांधून ही युती तोडली व राजदला सत्तेबाहेर फेकले. आता राजदला या युतीला टक्कर देण्यात कितपत यश मिळते याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या