विविधरंगी रानफुलांमुळे खुलले चांदोली परिसराचे सौंदर्य | Latest Marathi News


Marathi News... विपूल शहा / शिराळा :
निसर्ग हा सर्वात मोठा जादुगार आहे. त्याची किमया क्षणोक्षणी निसर्गातून अनुभवायला मिळते. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूकडील चांदोलीचा परिसर त्याचे उत्तम उदाहरण आहे. सध्या पावसामुळे चांदोलीचा परिसर नयनरम्य झाला आहे. यातच परिसरात फुलू लागलेल्या विविधरंगी फुलांची भर पडली आहे. गुढे - पाचगणी पठार तसेच शित्तूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील उदगिरीचा सडा सध्या विविधरंगी फुलांनी बहरून गेला आहे. कोरोनामुळे पर्यटकांची फारशी वर्दळ नाही. मात्र स्थानिक हौशी निसर्गप्रेमी या निसर्गसौंदर्याचा सध्या आनंद लुटताना दिसत आहेत.

सातारा शहराजवळील कास पुष्पपठारावरील बहुतांशी फुले गुढे - पाचगणी तसेच उद्गीरच्या पठारावर पहावयास मिळू लागली आहेत. त्यामुळे हा सडा पाहिल्यानंतर कास पठाराची आठवण झाल्यावाचून राहत नाही. चांदोली अभयारण्यातील झोळंबी पठारावरही या सर्व फुलांचा आविष्कार पहायला मिळत असतो. मात्र अद्याप त्याचा हंगाम सुरू झालेला नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तो बहरण्यास सुरूवात होईल. १५ दिवस तो राहतो. येथील पावसाचे प्रमाण व हवामान यावर या फुलांचे कमी-अधिक प्रमाणात फुलणे अवलंबून असते. यंदा या फुलांना अनुकूल वातावरण आहे. पावसाचे प्रमाणही माफक आहे. त्यामुळे ही फुले बहरली आहेत.

नयनरम्य परिसर, आल्हाददायक वातावरण 

हिरवागार निसर्ग, आल्हाददायक वातावरण यामुळे चांदोली परिसरात पर्यटकांची सतत गर्दी असते. सध्या या परिसरात फुलांच्या फुलण्याचा हंगाम सुरु झाला आहे. यात सदाफुली, नीलिमा, मंजिरी, स्मिथीया, सोनकी, धनगरी फेटा, सीतेची आसवे अशा अनेक जातींच्या फुलांचा समावेश आहे. ही फुले दिवसेंदिवस अधिकच खुलून दिसू लागली आहेत. त्यामुळे परिसर अत्यंत नयनरम्य व आल्हाददायक बनू लागला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच हा फुलांचा हंगाम पूर्ण क्षमतेने बहरतो. पुढे पंधरा दिवस ते तीन आठवडे हा हंगाम असतो. नंतर हळूहळू तो कमी होत जातो.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या