पोस्टकार्डावर उतरवले 133 वेळा 'कर्मवीर' l Latest Marathi News

कर्मवीर जयंतीनिमित्त अक्षरमित्राचे अनोखे अभिवादन


Marathi News... कराड  : ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ असा मूलमंत्र देत संपूर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात शिक्षणाची गंगोत्री पोहोचवणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133 वी जयंती 22 सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. त्याचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार, पत्रकार, अक्षरमित्र डाॅ. संदीप डाकवे यांनी कर्मवीरांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले आहे.
भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी दिली आहे. ‘कर्मवीर’ हे शब्द डाॅ. डाकवे यांनी एका पोस्टकार्डावर 133 वेळा सुंदर अक्षरात लिहून कर्मवीरांना अभिवादन केले आहे. तसेच पत्राच्या वरच्या डाव्या बाजूला 22.09.2020 ही तारीख तर दोन्ही बाजूला ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे वाक्य लिहिले आहे. पाठीमागील बाजूला ‘रयत’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या शब्दात रयत शिक्षण संस्थेचे बोध चिन्ह असलेले वडाचे चित्र मोठया कौशल्यपूर्वक रेखाटले आहे.

पोस्टकार्डाच्या काही सेंटीमीटरच्या आकारात 133 वेळा कर्मवीर लिहून अभिवादन करणारे बहुधा ते राज्यातील एकमेव असतील. कर्मवीर जयंतीच्या अनुषंगाने आपणही त्यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन करावे या भावनेतून हा उपक्रम राबवला असल्याचे डाॅ. डाकवे यांनी सांगितले आहे.
या अनोख्या उपक्रमासाठी त्यांना कलाशिक्षक जयंत कदम, बाळासाहेब कचरे, भरत कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कर्मवीरांची आकर्षक रेखाचित्रे

यापूर्वी अक्षरमित्र डाॅ. संदीप डाकवे यांनी ‘कर्मवीर’, ‘रयत’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘आण्णा’ अशा शब्दांमध्ये कर्मवीर आण्णांची आकर्षक आणि प्रमाणबध्द रेखाचित्रे चितारली आहेत. तसेच रांगोळी, पेंटींग यामधून देखील कर्मवीरांची चित्रे रेखाटत त्यांना अभिवादन केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या