Marathi News... तळमावले : ढेबेवाडी खोऱ्यातील काळगांवपासून जवळच असलेल्या डाकेवाडी या दुर्गम वाडीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून अनेक लोकांना विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे डाकेवाडीकरांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे लोक अजूनही त्रासलेल्या अवस्थेत आहेत. ग्रामीण भागात चांगला पाऊसपाणी झाल्याने काही अपवाद वगळता पिकेदेखील चांगली आहेत. शेतकरी वर्ग पोटच्या पोराप्रमाणे या पिकांची देखभाल करत आहे. भुईमूग, हायब्रीड, भात, सोयाबीन, नाचणी या पिकांची वन्य प्राण्यांकडून नासधूस केली जात आहे.
पेरणी झाल्यापासून शेतकरी या पिकांची निगा राखत आहे. परंतू वानरांपासून पिकांचे दिवसाचे रक्षण करावे लागत आहे तर रात्री रानडुकरे व अन्य जनावरांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी येथील शेतकरी वर्ग रात्रभर जागा राहत आहे. खोपा करुन जनावरांवर टेहळणी करत आहेत. काही दिवसांवर ही पिकांची काढणी आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांकडून पिकांचे आणखी नुकसान होवू नये यासाठी शेतकरी वर्ग अधिकच सतर्क राहिला आहे.
परंतु गेल्या दोन ते तीन दिवसापासून बिबट्याच्या दर्शनामुळे वाडीत घबराट पसरली आहे. यापूर्वी अन्य वाड्या वस्त्यावर बिबट्याकडून नुकसान केल्याच्या बातम्या डाकेवाडीत चर्चिल्या जात होत्या. परंतु आता दस्तूरखुद्द डाकेवाडीतच बिबट्याचे दर्शन झाल्याने लोक चिंतीत आहेत. वनविभाग व संबंधित प्रशासनाकडून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
अंधार पडल्यावर घराबाहेर पडू नका
पिकांची राखण करताना आम्ही रात्री साडे नऊच्या सुमारास निघालो असता आमच्यापासून काही अंतरावर बिबट्या दिसल्याने आम्ही बॅटरीचा प्रकाश पाडला. परंतु आमची जाणीव होताच बिबट्याने रानामध्ये धुम ठोकली. त्यामुळे लोकांनी अंधार पडल्यावर घराबाहेर पडू नये तसेच शेतामध्ये जाताना सतर्कतेने रहावे.
- पांडुरंग जाधव, शेतकरी.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या