उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी निलंबनाचे बजावले आदेश
Marathi News... सातारा : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सातारा तालुक्यातील परळीचा वनपाल योगेश पुनाजी गावित याच्यासह अन्य तीन वनरक्षकांना गुरूवारी तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्यात आले. सातारचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी निलंबनाचे आदेश बजावले.
सातारा तालुक्यातील ओंकार शिंदे (रा. पिरेवाडी, भैरवगड) हा ३१ ऑगस्ट रोजी शिवारातील पिकांचे माकडांपासून रक्षण करण्यासाठी शेतात गेला असता त्याला पकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन २५ हजार रूपये खंडणी घेतल्याप्रकरणी योगेश गावित, वनरक्षक (कुसवडे) महेश साहेबराव सोनावले, वनरक्षक (पळसावडे) रणजित व्यंकटराव काकडे व वनरक्षक (कार्यालय दहिवडी, सध्या कार्यरत ठोसेघर) किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरूध्द बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी योगेश गावित व वनरक्षक महेश सोनावले यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड केली होती. परंतु त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज येथील न्यायालयाने फेटाळून लावला.
दरम्यान, या अनुषंगाने सातारचे वनक्षेत्रपाल तसेच प्राथमिक चौकशी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालावरून उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी या चौघांना सेवेतून निलंबित केले.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या