GOOD NEWS... जिल्ह्यात प्रथमच बाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त | Latest Marathi News


सातारा :
सातारा जिल्ह्यात आज प्रथमच कोरोनाबाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आल्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला. दररोज पॉझिटिव्ह रूग्णांच्या झपाट्याने वाढत चाललेल्या संख्येपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या आज जास्त असल्याने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणाNयांचा हुरूप वाढणार आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ८९३ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, तर रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यात ८०० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मागील काही दिवसात रूग्णसंख्येचा वेग झपाट्याने वाढला आहे. परंतु त्या प्रमाणात डिस्चार्ज होत झाले नाहीत. त्यामुळे वाढणाNया रूग्णांना बेड मिळण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पण आज वाढलेल्या रूग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचा आकडा जास्त आहे. असे प्रथमच घडत आहे. त्यामुळे कोरोनाला परतवून लावण्यासाठी परीश्रम घेत असलेल्या सर्वांचेच मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, आज स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १६, कराड उपजिल्हा रुग्णालय २४, फलटण उपजिल्हा रुग्णालय ५६, कोरेगाव १११, वाई १२१, खंडाळा १२४, रायगाव १०५, पानमळेवाडी १०२, मायणी ५३, महाबळेश्वर ३५, पाटण २८, खावली २९ व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड १५३ अशा एकूण ९५७ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या