प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांना मातृशोक l Latest Marathi News


Marathi News... कराड : कराड तालुक्यातील पाल (खंडोबाची) येथील स्वातंत्र्य सैनिक व प्राथमिक शिक्षक विश्वनाथ शेजवळ गुरुजी यांच्या पत्नी सौ. वत्सला विश्वनाथ शेजवळ यांचे शनिवारी (दि. १९) सायंकाळी वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. आपल्या स्नेहपूर्ण व अगत्यशील स्वभावामुळे त्या सर्वांना परिचित होत्या. पती विश्वनाथ शेजवळ हे स्वातंत्र्य सैनिक व प्राथमिक शिक्षक असून सौ. वत्सला यांनी आपल्या पतीच्या शैक्षणिक कार्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

सौ. वत्सला शेजवळ यांच्या पश्चात पती विश्वनाथ शेजवळ, तीन मुले व दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव व लाल बहादूर शास्त्री कॉलेजचे प्राचार्य आहेत तर द्वितीय चिरंजीव संजय शेजवळ हे कराड पाटण शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक असून तिसरे चिरंजीव विजय शेजवळ पाल येथील प्रतिष्ठित व्यापारी व प्रगतशील शेतकरी आहेत. रक्षाविसर्जन व कार्य विधी सोमवार दिनांक २१/०९/२०२० रोजी पाल, ता. कराड येथे सकाळी ठीक ०९.०० वाजता संपन्न होईल.

सौ. वत्सला शेजवळ यांच्या निधनामुळे पाल गावावर शोककळा पसरली असून मित्रपरिवार, स्नेही, नातेवाईक व ग्रामस्थांनी आपल्या शोकभावना प्रकट केल्या.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या