कारनाम्याने वन विभाग वादाच्या भोवऱ्यात; तिघांना कोठडी
उंब्रज : पैशाच्या वसुलीसाठी मल्हारपेठ (ता. पाटण) येथील सराफ व्यावसायिकाचे अपहरण करून रात्रभर बेदम मारहाण केल्याच्या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात वन विभागातील कारनामे उघडकीस येत असताना त्यात या नव्या प्रकरणाची भर पडली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. पैकी तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मल्हारपेठ येथील सराफ व्यावसायिक सुहास शेटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या दुकानात वन विभागाचे पाटण तालुक्यातील अधिकारी विलास काळे हे दागिन्यांच्या खरेदीसाठी येत असल्यामुळे त्यांच्यात चांगली ओळख निर्माण झाली होती. यातून २०१७ साली काळे यांनी १२ लाख रूपये शेटे यांना दिले होते. ते पैसे ठरलेल्या मुदतीत न दिल्याच्या कारणावरून जमीन नावावर करून देण्याचा तगादा शेटे यांच्यामागे लावला. त्यासाठी काळे दांपत्याने वारंवार मानसिक त्रास दिला. परंतु याला नकार दिल्याने १२ सप्टेंबर रोजी विलास काळे व अन्य सहाजणांनी एका वॅगन आर कारमधून आपले अपहरण केले. अज्ञात ठिकाणी नेऊन पट्टा, पाईप, चप्पल यांच्या सहाय्याने आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यावेळी नातेवाईक, मित्रांकडून उसणे घेऊन, एटीएमवरून तसेच जवळची रोकड व सोन्याची अंगठी मिळून ५ लाख ४३ हजार त्यावेळी आपण त्यांना दिले. उर्वरित पैसे व्याजासह न दिल्यास कुटुंब संपवण्याची धमकी त्यांनी दिली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी तिघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून एकजण अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या