सातारा : आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात सातारा जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना सव्र्हे करत असताना आशांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज, फेस शिल्ड या सुविधा पुरवल्यानंतरच त्यांना सव्र्हसाठी पाठवा, कोरोनाबाधित आशा व त्यांच्या कुटुंबीयांना राखीव बेड द्या व उपचार सुविधा द्या, गावातील नागरिक व आरोग्य कर्मचारी यांच्याकडून चांगली वागणूक मिळावी यासाठी सूचना द्या, सव्र्हेसाठी आशांना मोबदला ३०० रुपये देण्यात यावा, सुरक्षा साहित्य पुरवण्यात यावे, सातारा नगरपालिकेतील आशांना कोमाँबीडचा सव्र्हे केला नाही म्हणून ऑगस्ट महिन्यातील मानधन काढले नाही ते त्वरित मिळावे, वाढीव मानधन त्वरित मिळावे, कोणत्याही कारणासाठी राजीनामा मागू नये, एएनएम व आरोग्य कर्मचारी यांची कामे आशांना देऊ नयेत. आशांचा कामाचा मोबदला मिळावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी आनंदी अवघडे, आरती आंजनकर, रोहिणी मोरे, प्रतिभा बनसोडे, माधुरी गुरव, आशा उपस्थित होत्या.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या