सातारा : सातारा तालुक्यातील सातारा - चाळकेवाडी जिल्हा मार्गावरून पांगारे, पळसावडेपर्यंतचा सहा किलोमीटरचा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्याचे निर्देश खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे तालुका अध्यक्ष विष्णू पवार यांनी दिली. या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने पांगारे, पळसावडे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा मार्ग क्र. ३६ ते पांगारे या रस्ताचे काम सुमारे १५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. परंतु सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पांगारे गाव डोंगरमाथ्यावर असल्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असते. अतिपावसाने रस्ता खचला असून डांबर पूर्णपणे उखडले गेले आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पांगारे ग्रामस्थ तसेच गावचे मुंबईकर यांच्यातर्फे माजी सरपंच विठ्ठल पवार, राष्ट्रवादीचे कांदिवली पूर्वचे अध्यक्ष विष्णू पवार, कृष्णा जाधव, सुरेश पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली.
प्रजिमा ३६ ते पांगारे, पळसावडेपर्यंत एकूण सहा किलोमीटरचा पक्का रस्ता तयार करून ग्रामस्थांची ही समस्या दूर करावी अशी मागणी त्यांनी त्यांच्याकडे केली. यासंबंधी निवेदनही दिले. या प्रयत्नांची दखल घेऊन खासदार पाटील यांनी तात्काळ या योजनेचे कार्यकारी अभियंता संदीप खलाटे यांना याबाबत निर्देश दिले. यासंबंधीचे पत्र त्यांनी पांगारे ग्रामस्थांना सुपूर्द केले. या कामामुळे परिसराची अनेक वर्षांपासून होत असलेली गैरसोय दूर होणार आहे. प्रदीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेले रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या