उदयनराजे यांच्यातर्फे सातारा येथील वृत्तपत्र छायाचित्रकारांचा सन्मान | Latest Marathi News


सातारा :
कोरोना महामारीच्या काळात अविरतपणे आपले जीव धोक्यात घालून एक ना एक घटना आपल्या कॅमेरात टिपून लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र छायाचित्रकारांचा खासदार उदयनराजे भोसले यांच्यातर्फे कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

महामारीच्या काळात अगदी सुरुवातीपासून सातारची कन्या हुआन प्रांतात अडकली होती. ती तिथून सुखरूप सातारला पोहोचली तेव्हापासून छायाचित्रकार अविरत काम करत आहेत. जिल्ह्यात प्रथम पॉझिटिव्ह सापडलेली महिला असो की प्रथम कोरोना बळी असो अशा सर्व घटना दररोज टिपून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या छायाचित्रकारांनी केले आहे. जेव्हा कोरोनाचे आकडे झपाट्याने वाढू लागले त्यावेळी पोलीस व प्रशासनासोबत राहून काम करत असताना यातील काहींना दुर्दैवाने कोरोनाची बाधाही झाली. अशा सर्व वृत्तपत्र छायाचित्रकारांचा खासदार उदयनराजे यांनी सन्मान केला.

सत्कारमूर्तींमध्ये प्रमोद इंगळे, नरेंद्र जाधव, रिझवान सय्यद, साई सावंत, जावेद खान, तबरेज बागवान, संजय कारंडे, प्रकाश वायदंडे, रणजित नलवडे यांचा समावेश होता. याप्रसंगी गोलू साळुंखे, काका धुमाळ, सुनील काटकर आदी उपस्थित होते.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या