शिवरायांच्या घराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे यांचे निधन ! Latest Marathi News


सातारा : छत्रपती शिवरायांच्या घराण्याच्या स्नुषा व सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी चंद्रलेखाराजे भोसले (वय ७७) यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. 

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या त्या काकी होत. सातारा शहरात वहिनीसाहेब म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाराव्या पिढीतील त्या सूनबाई होत्या. अत्यंत मनमिळावू, सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या, राजघराण्यातील असूनसुध्दा सामान्य लोकांशी सामान्यपणेच वागणाऱ्या आईसाहेबांविषयी सातारकर जनतेमध्ये नितांत आदराची भावना होती. 

काही महिन्यांपूर्वी त्या अदालत वाड्यातील आपल्या निवासस्थानी घसरून पडल्या होत्या. त्यांना अर्धांगवायूचाही त्रास झाला होता. पुणे येथील रुग्णालयात अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर सातारा येथील खासगी रुग्णालयातही उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पती शिवाजीराजे भोसले, मुलगी वृषालीराजे पवार (नाशिक), नातू कौस्तुभराजे पवार आणि जावई असा परिवार आहे. सातारा शहरातील अनेक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. असंख्य व्यक्तींना त्यांनी पाठबळ दिले. त्यांच्या जाण्यामुळे शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अदालत वाडा येथे त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले असून सायंकाळी त्यांच्यावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra , India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या