सातारा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले संतप्त झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी आक्रमक भूमिकाच त्यांनी ट्विट करत जाहीर केली आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील विद्याथ्र्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीमधील आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. अन्यथा होणाNया परिणामाला सामोरे जावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सरकारी नोकNया तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू, असेही ते पुढे म्हणाले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या