अवयव प्रत्यारोपनामुळे नवा जन्म लाभलेल्या कोमल पवार यांचे निधन | Latest Marathi News


सातारा :
अवयव प्रत्यारोपनामुळे नवा जन्म प्राप्त झालेल्या व पुढील आयुष्य अवयव प्रत्यारोपनासाठी जनजागृती करण्यास वाहिलेल्या सामाजिक कार्यकर्त्या कोमल पवार (वय २९) यांचे मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हैदराबाद येथील रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे सातारकरांमध्ये दु:खाची छाया पसरली.

सुमारे तीन वर्षांपूर्वी कोमल पवार यांच्यावर फुफ्फुस व हृदय प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्या शस्त्रक्रियेद्वारे आपल्याला नवा जन्म लाभल्याची त्यांची भावना होती. असा प्रसंग अन्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये आणि दुर्दैवाने आलाच तर त्यांना काही मदत व्हावी या हेतुने त्यांनी कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनची स्थापना करून आपले आयुष्य या कार्याला वाहिले होते. फलटण तालुक्यातील तरडफ येथील धीरज गोडसे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. या दोघांनीही फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयव दानासाठी जनजागृती व आवश्यक त्या ठिकाणी मदतीचे कार्य सुरू ठेवले होते.

गेल्या आठ - दहा दिवसांपासून कोमल पवार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना २६ ऑगस्ट रोजी हैदराबादला हलवण्यात आले होते. तेथील केआयएमएस रूग्णालयात डॉ. संदीप अट्टावर यांच्या निगरानीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. तीन दिवसांपासून त्यांचा उपचारांना प्रतिसाद कमी झाला होता. अखेर मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

त्यांचे पार्थिव रूग्णवाहिकेतून तरडफला आणले जात असून त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या