![]() |
| Image source - Google | Image by - BusinessToday |
गलवान खोऱ्यात मे महिन्यात चीनने केलेल्या आगळिकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर टिकटॉक, युसी ब्राऊजर, वेबो यांसारख्या ५९ चिनी अॅप्सवर बंदी घालून भारताने चीनला चोख प्रत्त्युत्तर दिले होते. आता पुन्हा भारताने तरूणाईला वेड लावलेल्या पब्जी या अॅपसह ११८ चिनी अॅप्सवर बंदी घालत ड्रॅगनचा ‘गेम’केला आहे.
चीनची विस्तारवादी मनोवृत्ती जगापासून लपून राहिलेली नाही. या वृत्तीतून भारताबरोबरच सर्व शेजारी राष्ट्रांच्या सीमांमध्ये ड्रॅगनची घुसखोरी सुरू आहे. यातूनच ५ मे २०२० रोजी गलवानची अमानूष घटना घडली होती. त्यामध्ये २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरातून चीनविरोधी संतापाची लाट उसळली होेती. त्या जनप्रक्षोभाची नोंद घेत केंद्र सरकारने तात्काळ ५९ चिनी अॅप्सवर बंदी घालून चीनला दणका दिला होता. आता आणखी ११८ मोबाईल अॅप्सवर बंदी घालून ड्रॅगनचा ‘गेम’ केला आहे.
तरूणाईला ज्या अॅपचे जणू व्यसनच जडले आहे, त्या पब्जीचा यामध्ये समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे. या मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी देण्यात आली आहे. बंदीमागे देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षितता व एकात्मतेला धोकादायक असल्याचे कारण सांगण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या