राज्यात हमीभावाने मूग खरेदी दि. १ ऑक्टोबरपासून | Latest Marathi News


Marathi News... सातारा :
हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दि. ३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. राज्यात दि. १ ऑक्टोबरपासून मूग खरेदीला सुरुवात होणार असून ही खरेदी प्रक्रिया पुढे ९० दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

दि. १५ सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरू झाली आहे. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन - २९, मार्केटिंग फेडरेशन - १०५, महाएफपीसी - ४७ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत २३० शेतकNयांनी मुगाची नोंदणी केली आहे. नोंदणीच्या क्रमवारीनुसार खरेदी केंद्रावर मूग आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. एसएमएस आल्यानंतर ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर शेतमाल घेऊन यावा. हंगाम २० - २१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मूग हमीभाव ७ हजार १९६ असा जाहीर केला आहे. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या