कुकुडवाड गटासाठी देसाई समुहाकडून ‘ऑक्सिजन’ सुविधा | Latest Marathi News


पाच जंबो ऑक्सिजन सिलेंडर सर्व मशिनसह आरोग्य विभागास सुपूर्द

Marathi News... दहिवडी : सध्या अतिशय भयावह परिस्थिती असून ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. पण कुकुडवाड गटातील कोणावरही अशी वेळ येवू नये म्हणून देसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागाकडे पाच जंबो ऑक्सिजन सिलेंडर सर्व मशिनसह मदत म्हणून देण्यात आले आहेत, असे प्रतिपादन सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या पुळकोटी (ता. माण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देसाई उद्योग समूहाकडून पाच जंबो ऑक्सिजन सिलेंडर सर्व मशीनसह मदत म्हणून देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, वरकुटे मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप, जालिंदर खरात, तानाजी काळेल, जांभुळणीचे सरपंच भोजलिंग काळेल, शहाजी काळेल, गणेश माने, समीर ओंबासे, डॉ. योगेश कुलकर्णी, अजित काळेल यांच्यासह ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सुविधांअभावी बळी जावू नयेत म्हणून मदत

अनिल देसाई म्हणाले, की ग्रामीण भागातील जनतेने अतिशय काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वत:ची काळजी घ्या म्हणजे समाजाची काळजी घ्याल. हा आजार निदर्शनास आल्यास आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधा. कोणीही आजार लपवू नका, योग्य उपचाराने हा आजार बरा होतो. योग्य उपचार व सोयीसुविधांच्या अभावी ग्रामीण भागातील जनतेचे हकनाक बळी जावू नयेत म्हणून ही मदत करण्यात आली आहे.

डॉ. कोडलकर म्हणाले, की सध्या सर्वत्र ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे उपचार करताना आम्हाला मर्यादा येत आहेत. पण देसाई कुटुंबियांनी दिलेल्या मदतीमुळे रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. या सिलेंडरच्या माध्यमातून एकावेळी किमान दहा रुग्णांवर या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करता येणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजनअभावी कोणाचाही मृत्यू होणार नाही. कुकुडवाड गटातील गंभीर रुग्णांना ही ऑक्सिजनची सुविधा येथेच देता येईल.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या