संजय राऊत उवाच... बिहारमध्ये कोरोना संपला का? | Latest Marathi News


प्रचाराचा अन्य मुद्दा नसल्याने सुशांत सिंग प्रकरणाचे राजकारण

Marathi News... मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश गंभीर संकटात सापडला असताना बिहार निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेलक्या शब्दात केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे. बिहारमध्ये कोरोना संपला का ? असा खोचक सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

निवडणूक तारखांची घोषणा होताच त्याविषयी सर्व स्तरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. खासदार राऊत यांनी या घडामोडींबाबत केंद्र सरकारवर निशाना साधला. देशात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अभूतपूर्व आहे. अशा स्थितीत निवडणूक जाहीर केली जात असेल, तर बिहारमधील कोरोना संपला का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

चांगल्या प्रशासनाचा, विकासाचा कसलाही मुद्दा नाही

मुळात निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दल - भाजप युतीकडे कोणताही ठोस मुद्दा नाही. चांगल्या प्रशासनाचा, विकासाचा कसलाही मुद्दा नसल्याने जनतेपुढे कसे जायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळेच सुशांत सिंग हा प्रचाराचा मुद्दा असावा म्हणून भाजपने त्या मुद्याचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या