घरोघरी तपासणीद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य : जगदाळे | Latest Marathi News


Marathi News... मसूर :
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाचा सव्र्हे होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे सहज शक्य होणार आहे, असा विश्वास जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी व्यक्त केला आहे.

मसूर (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. रमेश लोखंडे, डॉ. राजेंद्र डाकवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मसूर ग्रामपंचायतीने सहा महिन्यात कोरोनाच्या काळात अनेक उपक्रम राबवून चांगले कार्य केले आहे. त्यामुळेच प्रारंभी मसूरला एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नव्हता, असेही जगदाळे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सव्र्हे करताना स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासराव थोरात यांनी केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी स्वागत केले.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या