कोयनेतून कोणत्याही क्षणी विसर्ग; नदीकाठाला सतर्कतेचा इशारा | Latest Marathi News


पाटण :
कोयना धरणात सध्या १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ९९.३८ टक्के भरले आहे. पाणीसाठा १०५.२५ टीएमसी होताच पाण्याची आवक पाहून कोयना नदीपात्रात कधीही पायथा वीजगृह व वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण सद्यस्थितीत जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरले आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाNया या धरणात सध्या १०४.६० टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. दि. ७ जूनपासून आजअखेर कोयनानगर येथे ४२४२, नवजा ४८८५, महाबळेश्वर ४८६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आजची पाणीपातळी २१६३.०० फूट व ६५९.२८२ मीटर इतकी उंची झाली आहे. दरम्यान, यापुढे धरणात केवळ ०.६५ टीएमसी पाणीच बसू शकणार आहे. सध्या कोयना पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने जलाशयात पाण्याची आवकही होत आहे. त्यातच धरणातील पाणीसाठवण क्षमता संपत आल्याने यापुढे धरणाच्या पायथा वीजगृहातून व कोयना धरणाच्या ६ वक्र दरवाजातून पाण्याचा कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या