मुंबई : देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या व मोठा वारसा असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा विषय बराच काळ लोंबकळत पडला आहे. हा तिढा लवकर सुटावा असे पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते. आता या विषयात रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना काँग्रेसमध्ये घेऊन पक्षाचे अध्यक्ष करावे, अशी त्यांची सूचना आहे.
बिनधास्त रामदास आठवले अधूनमधून असे मोठ्या पक्षांना, नेत्यांना मौलिक सल्ले देत असतात. काहींना ते भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण देतात, काहींना आपल्या पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची ऑफर देतात. त्याच पध्दतीने आता त्यांनी पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.
राहुल गांधी पक्षाची जबाबदारी घेण्यास इच्छूक दिसत नाहीत. सोनिया गांधी यांचीही अध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी नाही. परिणामी पक्षाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मूळचे काँग्रेसचेच असणाऱ्या खासदार शरद पवार यांना पक्षाचे अध्यक्षपद देण्यात यावे. तत्पूर्वी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, असा आठवले यांचा सल्ला आहे. आपली ही केवळ सूचना आहे व त्याबाबतचा निर्णय तो पक्ष आणि शरद पवार यांनी घ्यायचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस हा देशातील सर्वात जुना व मोठा पक्ष आहे. पण सक्षम नेतृत्वाअभावी पक्षाचे नुकसान झाले आहे. दलित तसेच बहुजन समाज पक्षापासून दुरावला आहे. चारशेहून जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता १०० खासदारही निवडून आणू शकत नाही. त्यामुळे सध्या पक्षाची जबाबदारी घेण्यास कोणी पुढे येताना दिसत नाही. अशा स्थितीत शरद पवार यांच्यासारख्या नेत्याकडे अध्यक्ष पदाची धुरा सोपवल्यास पक्ष उभारी घेऊ शकेल, असे मत आठवले यांनी मांडले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या