सातारा : लॉकडाऊन पूर्णपणे उठलेला नसल्याने व्यावसायिक वाहनधारक अडचणीत आहेत. असे असुनही बऱ्याच बँका व फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी तगादा लावला असून त्यासाठी वाहने उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याविरोधात सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनच्या वतीने आज सातारा येथे निदर्शने करण्यात आली. याप्रश्नी ठोस निर्णय न झाल्यास दि. १० सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने आम्ही बँक व फायनान्स कंपन्यांकडे जमा करणार आहोत, असा इशारा यावेळी देण्यात आला.
सातारा येथे आयसीआयसीआय बँक, चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी, एचडीबी फायनान्स सर्व्हिसेस, इंडसइंड बँक, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी इत्यादींना असोसिएशनतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीमुळे वाहतुकदार व्यवसायाची अवस्थ अत्यंत बिकट झाली आहे. अशा स्थितीत सर्व बँका व फायनान्स कंपन्यांनी कर्जहप्ते फेडीसाठी ऑगस्ट २०२० पर्यंत मोरिटोरियम दिले आहे. १ सप्टेंबरपासून सर्व वाहनांचे कर्जाचे हप्ते सुरू होणार आहेत. सरकारने अद्याप लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. त्यामुळे कोणताही व्यावसायिक वाहनधारक कर्जाचे हप्ते भरू शकणार नाही. तरीही काही बँका व फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी तगादा लावला असून त्यासाठी वाहने उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याविरोधात विविध वाहतुक संघटनांच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून ही निदर्शने करण्यात आली.
यावेळी सावकार ट्रॅव्हल्सचे अक्षय गवळी, साई ट्रॅव्हल्सचे बाबा शेख, पुष्कराज ट्रॅव्हल्सचे धनंजय निकम, हर्षद ट्रॅव्हल्सचे हर्षद पवार, अष्टविनायक ट्रॅव्हल्सचे एकनाथ जाधव, बबलूराज ट्रॅव्हल्सचे जुबेर शेख, अमीर शेख, ताहीर शेख, रेखा ट्रॅव्हल्सचे अण्णा वायदंडे, रेणुका ट्रॅव्हल्सचे समीर दोडमनी, वक्रतुंड ट्रॅव्हल्सचे अजित पाटील, जेसी वंजारी ट्रॅव्हल्सचे जितेंद्र वंजारी, ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्सचे दादासाहेब शिर्के, रमेश कदम, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे महेश जाधव इत्यादी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या