५१३ नागरिकांना डिस्चार्ज, तर १८१ जणांचे नमुने तपासणीला
Marathi News... सातारा : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असलेल्या जिल्हावासीयांना आजचा दिवस हृदयावरील ओझे कमी करणारा ठरला. दररोज उच्चांकी रूग्णवाढीमुळे हबवूâन गेलेल्या जनतेला या चार दिवसात काहीसा दिलासा मिळत आहे. त्यात आजही मागील काही दिवसातील कमी रूग्णसंख्या नोंदली गेल्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात ४६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
याचबरोबर आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ५१३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच १८१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. फलटण येथे ५२, खंडाळा येथे ५८, रायगाव येथे ४९, पानमळेवाडी १७, महाबळेश्वर ५ अशा एकूण १८१ जणांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत, असे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १२४८०१
- एकूण बाधित - ३५४०१
- घरी सोडण्यात आलेले - २५५१४
- मृत्यू - १०७९
- उपचारार्थ रुग्ण - ८८०८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या