आधुनिक वाल्मिकी गदिमांचा ‘भारतरत्न’ने गौरव व्हावा : खाटिक | Latest Marathi News


जगविख्यात साहित्यिक, मान्यवरांची स्मारके माणदेशाची मुख्य ओळख व्हावी

Marathi News... आटपाडी : माणदेशी आटपाडी तालुक्यातील जगविख्यात साहित्यिक, मान्यवरांची स्मारके - स्फूर्ती केद्रे माणदेशाची मुख्य ओळख बनवा आणि आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचा भारतरत्न, महाराष्ट्र भूषणने मरणोत्तर गौरव करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.

१ ऑक्टोबरला गीत रामायणकार, महाकवी ग. दि. माडगूळकर यांची १०१ वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. राज्य शासनाने गदिमांना महाराष्ट्र भूषण जाहीर करून भारतरत्नसाठी तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, जन्मशताब्दी वर्षात आटपाडीतील गदिमा नाट्यगृहाच्या वाजलेल्या १३ कोटीच्या चौघड्याला तातडीने शुभारंभाचा मुहूर्त सापडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माणदेशाने जगाला दिलेली प्रतिभासंपन्न रत्ने

आटपाडी तालुक्याने जगाला गवसणी घालणारी अनेक प्रतिभासंपन्न रत्ने दिली, आटपाडी तालुका मुख्य महाल असलेल्या औंध संस्थानचे अधिपती भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी, संस्थानचे पंतप्रधान बॅरिस्टर आप्पासाहेब पंत प्रतिनिधी, थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना. सं. इनामदार (जन्मगांव गोमेवाडी), अरुण कांबळे, शांताबाई कांबळे (करगणी), अ‍ॅड. नानासाहेब झोडगे (माडगुळे), प्रकाश देशपांडे (वलवण), सुभाष कवडे (आटपाडी), प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी (शेटफळे), चित्रपट दिग्दर्शक म. गो. तथा बाबा पाठक, माजी केद्रीय मंत्री, माजी राज्यपाल राम नाईक, एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खाडेकर , प्रा. अंबादास माडगूळकर, बाबाखान दरवेशी (करगणी), लावणीसम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर (बनपुरी), आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार कै. आण्णासाहेब लेगरे, जतचे माजी आमदार अ‍ॅड. दिवंगत जयंत सोहनी (गोमेवाडी), औंध संस्थानचे मंत्री कै. रस्तुमरावबापू सेना सुभे चव्हाण देशमुख, संस्थानचे माजी मंत्री अमिनुदीन कुरेशी, संस्थानचे माजी आमदार मिठुलाल कलाल, कलाप्रेमी कवी मनाचे शिक्षक नवसरलाल कलाल, स्वतंत्रपूरचे पहिले जेलर अब्दूल अजिज काझी मास्तर , शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे ह. ग. देशमुख, रंगलाल कलाल, भा. दि. माडगूळकर, आकाशवाणीवर गाजलेले कृष्णराव सपाटे, जागतिक किर्तीचे मल्ल वस्ताद पैलवान नामदेव बडरे, शास्त्रज्ञ डॉ. दीपक पिंजारी इत्यादी अनेक जागतिक स्तरावर चमकलेले शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्चपदस्थ अधिकारी, प्रज्ञावंत, कलाकार, राजकारणी, मान्यवरांची जननी, कर्मभूमी आटपाडी तालुका आहे.

दिवंगतांची स्मृती चिरंतन जतन व्हावी तसेच आजही कार्यरत असलेल्यांचे महात्म्य सर्वांना एका छताखाली समजावे, नव साहित्यिक, साहित्यप्रेमींना प्रेरणा मिळावी, आटपाडी तालुक्याचे हे वैभव टिकावे यासाठी या साहित्यिकांची, प्रज्ञावंताची स्मारके - स्फूर्ती केंद्रे त्यांच्या जन्मभूमी, कर्मभूमीत उभारणे अत्यंत गरजेचे आहे.

काय असावे या स्फूर्ती केंद्रांचे स्वरूप... 

या सर्व स्मारक, स्फूर्ती केंद्रामध्ये ५०० आसन क्षमतेचे सांस्कृतिक भवन व्हावे, ग्रंथालय, अभ्यासिका, मोफत वाचनालय केले जावे. यामध्ये साहित्यिकांचे समग्र साहित्य, ग्रंथसंपदा असावी, पर्यटकांसाठी शासकीय विश्रामगृह, शिशु विहार, बलो उदयान व सावलीचे घड्याळ करण्यात यावे, वनस्पतीशास्त्र युक्त प्रशस्त बाग असावी, लहान मुलांसाठी बागेत एका बाजूस पोहण्याचा तलाव, खेळांसाठी क्रीडांगण असावे ही स्मारके - स्फूर्ती केंद्रे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावीत, वृंदावन गार्डनच्या धर्तीवर सर्वच्या सर्व स्मारकांमध्ये ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांच्या रोषणाईचा नेत्रोत्सव असावा, माणदेशातील लोककलांचे, लोकगीतांचे कलादालन सर्व स्मारकांचे आकर्षण ठरावे.

आटपाडी - माडगुळे, आटपाडी - शेटफळे आणि उंबरगाव - आटपाडी - भिवघाट या तीन मार्गांच्या दुतर्फा उंच आणि भव्य अशा संगमरवरी फरशांच्या ५६ होर्डिंग्जवर गदिमांच्या गीत रामायणातील अजरामर ५६ गीते चितारून गदिमांच्या परमेश्वरी प्रतिभेला वंदन केले जावे. गदिमा जन्मभूमी, कर्मभूमीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आटपाडीतून माडगुळे, शेटफळेला जाताना संथ गतीने अथवा चालत जाण्याचा मोह व्हावा इतक्या सुंदरतेने हे रस्ते गीत रामायणाच्या पवित्र गीतांनी भारले जावेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या