राष्ट्रपती पदकाने सन्मानाबद्दल साबळे यांचा सत्कार | Latest Marathi News


कमला मिलच्या भीषण आगीतून २०० जणांचे वाचवले प्राण 

Marathi News... सातारा : राष्ट्रपती पदकाने सन्मान झाल्याबद्दल सातारा तालुक्यातील पिलाणी (खालची) या गावचे सुपुत्र महेश साबळे यांचा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साबळे यांच्या धाडसामुळे सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढला, असे गौरवोद्गार शिवेंद्रराजे यांनी यावेळी काढले. 

महेश साबळे यांनी मुंबईत लोअर परळ येथील कमला मिलला लागलेल्या भीषण आगीवेळी धाडस दाखवून २०० जणांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या धाडसी कामगिरीची नोंद घेऊन त्यांना राष्ट्रपती सर्वोत्तम जीवन रक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, संतोष कदम, शेळकेवाडीचे सरपंच संतोष शेळके, अशोक कदम फौजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान, कौंदणी गावचे दिलीपराव यादव यांची भाजप दक्षिण मध्य मुंबईचे  जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही आमदार शिवेंद्रराजे यांनी सत्कार केला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या