माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांसाठी ऑक्सिजन मशिनची सुविधा | Latest Marathi News


Marathi News... कराड :
कराड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या कोविड निधीतून 'मिशन ऑक्सिजन : मी शिक्षक, शिक्षक माझे कुटुंब' अंतर्गत शिक्षकांच्या सेवेत ३ ऑक्सिजन मशिनची सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे व तालुका अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी दिली.

कोरोना संकटाच्या परिस्थितीत माध्यमिक शिक्षकाच्या घरातील कुणाला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्यास तत्पर ऑक्सिजन मिळावा या उद्देशाने जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी कराड तालुका माध्यमिक कोवीड योध्दा ग्रूप तयार करुन त्याद्वारे तालुक्यातील सर्व माध्यमाच्या माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना निधी संकलित करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातून निधी संकलन झाल्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याचे नलवडे यांनी सांगितले.

या मशिनची सेवा तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या घरच्या रूग्णांना मिळेल, देणगीदारांना प्राधान्य राहील.डॉक्टरांचे शिफारस पत्र अनिवार्य आहे. हे मशिन हवे असल्यास रूग्ण विंâवा नातेवाईकांच्या आधारकार्डची झेरॉक्स देणे गरजेचे आहे. मशिनसाठी कराड उत्तरसाठी एस. व्ही. चव्हाण (यशवंतनगर), सुधाकर चव्हाण (बनवडी), कराड शहरसाठी इम्राण मुल्ला (शाहीन हायस्कूल, कराड), सचिन नलवडे, तर कराड दक्षिणसाठी राहूल मोहिते, मनोज जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या