सहकार, पणन खात्याची सूत्रे पुन्हा बाळासाहेब पाटील यांच्याकडे | Latest Marathi News


सातारा :
राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसात ते रूग्णालयात होते. त्यानंतर आजपासून सहकार व पणन खात्यांचा कार्यभार त्यांनी पुन्हा हाती घेतला आहे.

बाळासाहेब पाटील १४ ऑगस्टपासून कराडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही काळ मुंबईत विश्रांती घेऊन ते पुन्हा जनतेच्या सेवेत दाखल झाले आहेत. तथापि, त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात त्यांच्याकडील सहकार व पणन या खात्यांचा कार्यभार तात्पुरती व्यवस्था म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आजपासून बाळासाहेब पाटील यांनी या खात्यांची सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत. तसा शासन आदेश निर्गमित झाला आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या