दोन गावठी पिस्टल, चार मॅगझिन व ३० जिवंत काडतुसे हस्तगत
Marathi News... सातारा : गावठी पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने कराडला आलेल्या एकाला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड येथील ढेबेवाडी फाट्यावर शिताफीने पकडले. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, चार मॅगझिन व ३० जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. शुभम प्रकाश ढवळे (वय २७, रा. दत्त हौसिंग सोसायटी, आगाशिवनगर, कराड) असे संशयिताचे नाव आहे.
ढेबेवाडी फाटा येथे एकजण गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची टीप स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सूचनेनुसार तत्काळ ढेबेवाडी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना अढळून आला. त्याच्यावर संशय बळावल्याने पथकाने त्याला हटकले असता त्याने हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यास पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.
त्याची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव शुभम ढवळे असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व पँटच्या खिशात जीवंत काडतूस तसेच त्याच्या हातातील पिशवीमध्ये आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल तसेच चार मॅगझिन, ३० जिवंत काडतुसे व एक मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३७ हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जNहाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विनोद गायकवाड, मोहन नाचण, शरद बेबले, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, संजय जाधव यांनी केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या