कितीही आदळआपट करा, पुढील दहा वर्षेही 'ठाकरे सरकार' ! | Latest Marathi News


Marathi News... सातारा :
महाविकास आघाडीचे सरकार सध्या कोविड संसर्ग रोखण्याच्या लढाईत गुंतलेले आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली, तरी या सरकारवर किंचितही फरक पडणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष २०० टक्के पूर्ण करेल. पुढील दहा वर्षेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करेल. विरोधकांनी आपला वेळ व्यर्थ घालवू नये, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना लगावला आहे.

पोलीस खात्याकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेल्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता देसाई यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यासंदर्भात अद्याप आपली गृहमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा झालेली नाही. पण चर्चा करून माहिती घेणार आहे. आपण पाटण तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्याच्या कामात व्यस्त होतो. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भक्कम विचाराने बनले आहे. शिवसेनेचे नेतृत्व असलेल्या या सरकारला राष्ट्रवादी व काँग्रेसने भक्कम पाठिंबा दिला आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाल २०० टक्के पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या महाविकास आघाडीच्या सरकारने कोविडचा संसर्ग रोखण्याला प्राधान्य दिलेले आहे. इतर कोणत्याही बाबीला प्राधान्य राहणार नाही. सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस अधिकाNयांची नावे गृहमंत्र्यांकडे असतील तर तेच याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या